खून, दरोडा, खंडणी गुन्ह्यातील आरोपी गजाआड

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केले सहा जणांना जेरबंद

कापूरहोळ- खुनाचा प्रयत्न, दरोडा आणि खंडणी अशा गंभीर गुन्ह्यातील सहा जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. आदित्य तानाजी चौधरी (वय 19), संकेत महादेव कुंभार (दोघेही रा. सासवड ता.पुरंदर) अनिकेत महादेव काळे (वय 19), सागर वसंत काळे (दोघेही रा. करमाळा सोनोरी, ता. पुरंदर), अभिजीत विजय भिलारे (रा. भिलारवाडी हातवे बुद्रुक, ता. भोर) व संतोष बाळासाहेब पवार (वय 19, रा. मुकादम वाडी, ता. पुरंदर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पुण्यात सासवड पोलिसांनी आशिष शेंडकर, उद्धव शेंडकर यांना प्राणघातक हल्ला प्रकणी अटक केली आहे. मुख्य आरोपी दिगंबर शेळके, आदित्य कळमकर यासह इतर फरारी आरोपींचा शोध सुरू आहे. दिगंबर शेंडकर आणि त्याच्या साथीदारांनी खंडणीसाठी महेश भैरवनाथ कामटे (वय 25) यांना दुचाकीवर बसवून आडरानात नेऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. कामठे यांच्याकडील 2000 रोकड घेऊन पलायन केले होते. चांबळी (ता.पुरंदर) गावच्या हद्दीत सोमवार (दि. 9) सायंकाळी ही घटना घडली होती.

पंधरा दिवसांपूर्वी राजगडच्या हद्दीत अटक व फरारी आरोपींनी नसरापूर येथील शासन मान्य एका ताडीच्याच्या दुकानावर दरोडा घालून 46 हजारांचा ऐवज चोरून हे सर्व जण दुचाकीवरून पसार झाले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल मोरे, रामेश्वर धोंडगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप जाधवर, श्रीरंग माळी, हवालदार राजू चंदनशीव, सचिन गायकवाड, जगदीश शिरसाट, रवींद्र शिनगारे, अमोल शेडगे, ज्ञानदेव क्षीरसागर, दत्तात्रय तांबे, बाळासाहेब फडके, अक्षय नवले आदींनी ही कामगिरी केली आहे.

  • खुनाचा प्रयत्नातील दोन गुन्ह्यातील व दरोडा गुन्ह्यातील आरोपीच्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. या आरोपींविरुद्ध यापूर्वी बरेच गुन्हे दाखल आहेत. आरोपींवर दाखल असणारे गुन्हे यांचा पूर्वइतिहास पडताळून संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई करणार आहे.
    – दत्तात्रय दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, राजगड पोलस स्टेशन
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)