Baramati lok sabha 2024 : लोकसभा निवडणूकीसाठी प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या ओबीसी बहुजन पार्टीनेही आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत. ओबीसी बहुजन पार्टीने आज 9 उमेदवार जाहीर केले आहेत.
महत्त्वाचे म्हणजे प्रकाश शेंडेगे यांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात बारामतीतून महेश भागवत यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्याविरोधात पहिला उमेदवार ठरला आहे. | Baramati loksabha Supriya Sule
दुसरीकडे कोल्हापूरमध्ये काँग्रेस उमेदवार शाहू महाराज, तर प्रकाश आंबेडकर यांना अकोल्यात पाठिंबा जाहीर केला आहे. प्रकाश शेंडगे म्हणाले, आज आमच्या सुकाणू समितीची बैठक झाली. आज बैठकीत आम्ही 9 उमेदवार फिक्स केले आहेत. | Baramati loksabha Supriya Sule
प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा सुरु आहे. त्यात त्यांनी सांगलीतील जागेवर आम्हाला समर्थन केलेले आहे. मी स्वत: जर निवडणूक लढवली तर प्रकाश आंबेडकर सांगलीतील जागेवर पाठिंबा देणार आहेत. प्रकाश आंबेडकर अकोल्यातून निवडणूक लढवत आहेत, तिथे आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे, असेही शेंडगे यांनी स्पष्ट केले. | Baramati loksabha Supriya Sule
प्रकाश आंबेडकरांचा मेगाप्लॅन ! भाजप विरोधात नव्या आघाडीचे संकेत देत म्हणाले..
WhatsApp वर प्रचार करणे पडले महागात ! जिल्हा परिषद कर्मचारी निलंबित..