देहूरोड डेपोत अनोखे रक्षाबंधन

जवानांप्रती आदर : मुलींनी कागदापासून बनविल्या राख्या

देहूगाव – निगडी येथील मॉडर्न हायस्कूल कर्णबधीर आणि आर. एस. पी. पथकाच्या मुलींनी देहुरोड सीक्‍यूए डेपोमध्ये सैनिक आणि अधिकाऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले. जवानाविषयी असलेल्या आदर भावनेमुळे मुलींनी स्वतः कागदापासून पर्यावरणपूरक राख्या बनविल्या होत्या. परकीय शत्रूपासून देशाचे रक्षण करण्याबरोबरच, सांगली-कोल्हापूर मधील पूरस्थितीमध्ये देखील जवानांनी लोकांचे प्राण वाचविले आहेत. आपण जवानांच्या त्यागामुळेच देशात सुरक्षित असल्याचे मनोगत मुलींनी व्यक्‍त केले.

या वेळी देहुरोड डेपोतील लेफ्टनंट कर्नल एम. एस. सोनी यांनी या कर्णबधिर मुलींचे विशेष कौतुक केले. तसेच सरंक्षण क्षेत्रातील अनेक संधींची देखील माहिती दिली. देहुरोड डेपोतील, वर्क युनियन लीडर सचिन करंदीकर, ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिसर मीरा मिरजकर, अजिंक्‍य भोसले यांनी संयोजन केले.
शाळेतील कर्णबधिर युनीटच्या शिक्षिका कुसूम पाडळे, अनुराधा आंबेकर, गंगाधर सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.