मुंबई – खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठोपाठ आता केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनाही करोनाची लागण झाली आहे. दोन दिवस नाशिक-मुंबई दौरा झाल्यानंतर डॉ. भारती पवार यांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांनी करोनाची चाचणी केली. या चाचणीचा त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
डॉ. भारती पवार यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी संपर्कात आलेल्या लोकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. खासदार हेमंत गोडसे आणि भारती पवार दोन दिवसांच्या नाशिक-मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यानंतर खासदार गोडसे यांचा अहवाल प्रथम पॉझिटिव्ह आला.
त्यानंतर डॉ. भारती पवार यांचाही करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात लोकसभेचे सदस्य अरविंद सावंत, मंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार विद्या ठाकूर यांनाही करोनाचा संसर्ग झाला होता.