रायपूर (छत्तीसगढ) : घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती सातत्याने वाढत आहेत, यात कोणतेही तथ्य नाही. आंतरराष्ट्रीय मार्केटमधील दरांमुळे या महिन्यात सिलिंडरचे दर वाढले. पुढील महिन्यात ते कमी होतील, अशी अपेक्षा पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केली.
रायपूर येथील विमानतळावर प्रधान पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, पुढील महिन्यापासून इंधन तेलाच्या किंमतीत घट होण्याचे संकेत मिळत आहेत. हिवाळ्यामुळे गॅस वापरात वाढ झाली होती. त्यामुळे या बाबतीत काहीसा आर्थिक ताण आला होता. या महिन्यात किंमती वाढल्या असतील तर पुढील महिन्यात त्या उतरतील, असे ते म्हणाले.