WhatsApp Gas Booking : व्हॉट्सअपचे जगभरात कोट्यवधी वापरकर्ते आहेत. व्हॉट्सअपचा वापर खास करून चॅटिंगसाठी केला जातो असे म्हंटले जाते. मात्र याचा अधिक वापर इतर अनेक महत्त्वाच्या गोष्टींसाठी सुद्धा केला जातो. अनेक बँका आता व्हॉट्सअपवर मर्यादीत बँकिंग सोयी-सुविधा पुरवत आहेत. मात्र आता गॅसचे बुकिंगसुद्धा व्हॉट्सअपवर करता येणे शक्य आहे. अनेक गॅस रिफलिंग कंपन्यांनी ही सेवा सुरु केली आहे. त्यामुळे तुम्हाला काही मिनिटांमध्ये गॅस बुक करणे सोपे होणार आहे. यासाठी तुम्हाला नेमकं काय करावे लागणार आहे. ते समजून घेऊयात.
वैयक्तिकरित्या ऑफिसमध्ये जाऊन गॅस रिफिल करणे ही आमच्यासाठी डोकेदुखी बनली आहे. हे टाळण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअॅपद्वारे गॅस बुक करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवरुन गॅस बुकिंगसाठी तुमच्या कंपनीच्या क्रमांकावर संपर्क करावा लागेल. त्यावर मॅसेज पाठवावा लागेल. ज्या कंपनीकडून तुम्ही गॅस खरेदी करता त्या कंपनीला व्हॉट्सअॅपवर मेसेज करा.
याकरिता HP GAS- 9222201122, Indane- 7588888824 आणि भारत गॅस- 1800224344 हे क्रमांक सेव्ह करा. तुम्हाला आवश्यक असणाऱ्या नंबरवर मॅसेज पाठवून पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यानुसार गॅस बुकिंग करता येईल. सध्या ई-केवायसी करणे पण आवश्यक आहे.
गॅस बुक करण्यासाठी अशी पद्धत वापरा
- सर्वप्रथम तुम्हाला नंबर सेव्ह करून HI लिहावे लागेल, त्यानंतर तुम्हाला तुमची भाषा निवडावी लागेल.
- यानंतर, तुम्ही येथून गॅस बुक, नवीन कनेक्शन, कोणतीही तक्रार इत्यादी सर्व काही करू शकता.
- तुम्हाला स्क्रीनवर अनेक पर्याय दिसतील ज्यामधून तुम्ही तुमच्या गरजेनुसार कोणताही पर्याय निवडू शकता.
- गॅस रिफिल बुकिंग केल्यानंतर तुम्हाला ऑर्डर पूर्ण झाल्याची सूचना मिळेल.
- सिलेंडर बुकिंगची डिलिव्हरी तारीख देखील उत्तरात दिली जाईल.
- गॅस बुकिंगची स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला STATUS आणि ऑर्डर क्रमांक लिहून त्याच क्रमांकावर पाठवावा लागेल.