अमेरिकेत अज्ञाताकडून बेछूट गोळीबार : 20 ठार तर अनेक जण जखमी

टेक्‍सास : अमेरिकेच्या टेक्‍सासमध्ये अज्ञात हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात 20 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. टेक्‍सासच्या एल पासो येथील वॉलमार्टमध्ये ही घटना घडली आहे. गोळीबारात 20 पेक्षा अधिक जण जखमी आहेत. हा हल्ला करणारा 21 वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याबाबत ट्विट करत, एल पासो येथे झालेली गोळीबाराची घटना फक्त दुख:दायक नाही तर क्रुर आहे. अशी शत्रुत्वाची भावना ठेवणाऱ्या घटनांचा मी निषेध करतो. निर्दोष लोकांचे जीव घेणाऱ्यांबद्दल कोणतीही सहानभुती दाखवणं चुकीचं ठरेल. असे म्हटले आहे. शनिवार असल्याने अनेक लोकांनी वॉलमार्टमध्ये खरेदी करण्यास मोठी गर्दी केली होती. बेछुटपणे केलेल्या गोळीबारात अनेक जणांना गोळ्या लागल्या. हल्लेखोराने काळा टी शर्ट आणि कानात हेडफोन घालून असल्याचं प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.