लोणी काळभोर – तिरुपती बालाजी येथे देवदर्शनाला निघालेल्या थेऊर फाटा येथील 19 वर्षीय युवकाचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर आणखी तिघेजण जखमी झाले. अथर्व सचिन धुमाळ (वय 19, रा. थेऊर फाटा, कुंजीरवाडी, ता. हवेली) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. हा अपघात शनिवारी (25 फेब्रुवारी) झाला होता. अथर्व याच्यावर उपचार सुरु असताना शनिवारी (दि. 4) त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
अथर्व व त्याचे मित्र हे चारचाकी गाडीतून तिरुपती बालाजी येथे देवदर्शनाला चारचाकी गाडीतून निघाले होते. कर्नाटक राज्यातील बेंगलोरच्या जवळ असलेल्या चित्रदुर्ग जवळील हिरीवूर या गावाजवळ गेले असता त्यांच्या चारचाकी गाडीने रस्त्यावर उभ्या असलेल्या एका कंटेनरला जोरदार धडक दिली. येथील श्रीनाथ पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप धुमाळ यांचा तो पुतण्या आहे.