वरुण धवन सध्या मालदिवमध्ये सुट्टी एन्जॉय करतो आहे. या सुट्टीकाळातील उद्योगाचे व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. त्यामध्ये तो समुद्राच्या पाण्यामध्ये जलक्रीडा करण्याचा आनंद घेताना दिसतो आहे. सी-स्कूटरच्या मदतीने पाण्याखाली पोहोतानाचाही व्हिडिओ त्याने शेअर केला आहे.
View this post on Instagram
या फोटोला त्याने “हॅशटॅग बीईंग अंडरवॉटर’ अशी कॅप्शन दिली आहे. हा व्हिडिओ म्हणजे आपला या वर्षातला सर्वात फेव्हरेट शो असणार आहे, असेही वरुण धानने म्हटले आहे. वरुणचे वडील डेव्हिड धवन दिग्दर्शित “कुली नं 1’मध्ये वरुण दिसणार आहे.
View this post on Instagram
हा गोविंदा आणि करिष्मा कपूरच्या “कुली नं 1’चा रिमेक असणार आहे. त्याबरोबर अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या “नमक हलाल’चाही रिमेक डेव्हिड धवन करत आहेत आणि या रिमेकमध्येही वरुण धवन लीड रोलमध्ये दिसणार आहे, अशी बातमी काही दिवसांपूर्वी पसरली होती.
View this post on Instagram
मात्र वरुण धवनने तशी कोणतीही शक्यता नसल्याचे म्हटले आहे. लोकांनी माझ्याबाबत खोट्या बातम्या पसरवल्या तर चालेल एकवेळ पण कृपया माझ्या वडिलांबाबत खोट्या बातम्या पसरवू नका, अशी आर्जवी विनंतीही वरुण धवनने केली आहे. येत्या ख्रिसमसमध्ये आपला नवीन सिनेमा रिलीज होईल, असेही त्याने म्हटले आहे.
View this post on Instagram