UEFA Euro Cup 2021 | स्पेन व स्विडन संघात करोनाची एन्ट्री

रोम – यूएफा यूरो करंडक स्पर्धेला प्रारंभ होत असतानाच स्पेन व स्विडन या संघातील प्रत्येकी दोन खेळाडू करोनाबाधित असल्याचे समोर आल्याने पुन्हा एखदा स्पर्धेला धोका निर्माण झाला आहे. जवळपास महिनाभर चालणाऱ्या स्पर्धेत एकूण 24 संघ सहभागी होणार असून 51 सामने खेळले जाणार आहेत. मात्र, स्पर्धेची सुरुवात होण्यापूर्वीच हा प्रकार झाल्यामुळे आयोजकांनीही चिंता व्यक्त केली आहे.

आता स्पर्धा संयोजकांनी स्पर्धेत सहभागी सर्व संघातील सर्व खेळाडूंचे लसीकरण करण्याचे निश्‍चित केले आहे. स्पेनचा कर्णधार व स्ट्रायकर सर्गिओ बसक्वेट आणि डिएगो लोरेन्ट यांना तर, स्वीडनच्या देजा कुलुसेवस्की आणि मॅथिस स्वानबर्ग या खेळाडूंना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यांना तातडीने विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

स्पेनचा पहिला सामना स्वीडनशी येत्या सोमवारी होणार आहे. स्पेनच्या गटात पोलंड, स्लोवाकिया, स्वीडन यांचा समावेश आहे. मात्र, करोनाबाबत काळजी घेण्यासाठी स्पेन संघ व्यवस्थापनाने एक राखीव संघ तयार केला आहे.

करोनाची बाधा जास्त खेळाडूंना झाली तर दुसरा संघ खेळवण्याची तयारी स्पेनने केली आहे. या निर्णयामुळे टोकियो ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या खेळाडूंना फायदा होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.