UEFA Euro Cup 2021 | प्रेक्षकांच्या साक्षिने रंगणार स्पर्धा

रोम – जागतिक फुटबॉल स्पर्धेतील सर्वात श्रीमंत समजली जात असलेल्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ झाला असून करोनाच्या धोक्‍यानंतर प्रथमच प्रेक्षकांना मर्यादित संख्येत प्रवेश देण्यात आला आहे. ही स्पर्धा यंदा यशस्वी होईल आणि करोनाचेही संकट दूर होईल, असा विश्‍वास युरोपियन फुटबॉल महासंघाने व्यक्त केला आहे.

स्पर्धेचे यंदा 60 वे वर्ष असून प्रथमच तब्बल 11 शहरांना स्पर्धेतील सामन्यांचे यजमानपद बहाल करण्यात आले आहे. स्पर्धेत प्रत्येक शहरातील करोनाची स्थिती आणि स्टेडियमच्या एकूण प्रेक्षक क्षमतेचा आढावा घेऊन चाहत्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. बुडापेस्ट येथेच फक्त 100 टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे.

स्पर्धेतील सलामीचा सामना बलाढ्य इटली आणि अंडरडॉग टर्की यांच्यात होणार आहे. या दोन संघात यापूर्वी झालेल्या 11 आंतरराष्ट्रीय सामने झाले असून इटलीने आठ लढती जिंकल्या आहेत. तीन सामने बरोबरीत सुटले आहेत.

इटलीचा संघ गेल्या 27 सामन्यांपासून अपराजित आहे, तर टर्कीला युरो चषकात आतापर्यंत चार वेळा सलामीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला आहे. गेल्या जवळपास दीड वर्षांपासून विविध देशांना करोनाविरुद्ध लढा द्यावा लागला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.