Uddhav Thackeray | Devendra Fadnvis : राज्यासह देशात सध्या लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक बडे नेते आपल्या राजकीय सभा घेत असल्याचं दिसून येत आहे. एकमेकांवर वारंवार टीका देखील करत आहेत. अश्यातच आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईतील जोगेश्वरी पूर्व परिसरात जनसंवाद सभा पार पडली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला.
यावेळी उद्धव ठाकरेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील नाव न घेता सडकून टीका केल्याचं पाहायला मिळालं. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘भाजपची वाईट खोड आहे. यांना लग्नातही बोलावू नये. हे 35 पुरणपोळ्या खातील आणि नवरा बायकोचे भांडण लावतील. अशी भाडोत्री जनता पक्ष मी एवढ्यासाठीच म्हणतोय त्यांच्याकडे त्यांच्या पक्षातील कोणीच नाही. सगळे आयात केलेले आहेत. असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, ‘चार दिवसांपूर्वी भाजपची 195 उमेदवारांची यादी जाहीर झाली. त्यामध्ये नरेंद्र मोदींचे नाव आहे. शहाचं नाव आहे. ज्याच्यावर मालमत्ता जमा केली म्हणून भाजप बोंबलत होता त्या कृपाशंकर सिंगचा नाव मात्र गडकरींचं नाव नाही, अशी टीकाही ठाकरे यांनी केली आहे.
उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का.! सर्वात जवळचा आमदार देणार CM शिंदेंची साथ । Uddhav Thackeray | Devendra Fadnvis
ऐन निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आमदार रवींद्र वायकर आज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रवींद्र वायकर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर रवींद्र वायकरांचा जाहीर पक्षप्रवेश होणार आहे. । Uddhav Thackeray | Devendra Fadnvis