शिवेंद्रसिंहराजे भोसले; विरोधी बाकांवर बसून कामे होत नाहीत
आजच्या पदयात्रेचा मार्ग
शनिवार, दि. 5 रोजी सकाळी 7 वाजता ढोल्या गणपती, समर्थ मंदिर, बोगदा, भुई गल्ली, खारी विहीर, डफळे हौद, तारळेकर चौक, लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, कात्रे वाडा, हेडगेवार चौक, कोल्हटकर आळी ते चांदणी चौक या मार्गावर पदयात्रा होणार आहे. बनसोडे वस्ती (करंजे पेठ) येथे सायंकाळी 6 ते 8 या वेळेत कोपरा सभा होणार आहे.
सातारा – विरोधी बाकांवर बसून म्हणावी तशी विकासकामे होत नाहीत. त्यामुळे सातारा शहराचा आणि पूर्ण मतदारसंघाचा विकास गतिमान करण्यासाठी मी भाजपमध्ये प्रवेश केला. स्व. भाऊसाहेब महाराजांच्या आदर्शांनुसार मी राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व दिल्याने मतदारसंघातील जनतेने मला पुत्रवत प्रेम दिले आहे, असे प्रतिपादन शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. भाजप-शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीचे सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार उदयनराजे भोसले आणि सातारा विधानसभा मतदारसंघातीर उमेदवार शिवेंद्रसिंहराजे यांच्या
प्रचारार्थ साताऱ्यात बुधवार
नाका, बारटक्के चौक, बसाप्पा पेठ, कोमठी चौक, झेंडा चौक, इंदलकर आळी, कुंभार आळी, भैरवनाथ पटांगण, भैरवनाथ मंदिर, विभूते पार, श्रीपतराव पाटील हायस्कूल, मेहेर देशमुख कॉलनी, बाबर कॉलनी, शेंडे गणपती मंदिर ते बुधवार नाका या मार्गावर काढण्यात आलेल्या पदयात्रेत उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांनी नागरिकांशी संवाद साधला बोलत होते. पदयात्रेत नगराध्यक्ष सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, नगरसेवक अशोक मोने, अमोल मोहिते, विजय काटवटे, धनंजय जांभळे, अविनाश कदम, राजू भोसले, सौ. सुजाता राजेमहाडिक, सौ. स्नेहा नलवडे, सौ. लीना गोरे, सौ. सीता हादगे, सौ. अनिता घोरपडे, सौ. सविता फाळके, सौ. प्राची शहाणे, शकील बागवान, शेखर मोरे-पाटील, किशोर गोडबोले, जयेंद्र चव्हाण, नासीर शेख, प्रकाश बडेकर, मनोज शेंडे, सौ. सुवर्णा पाटील, सौ. दीपलक्ष्मी नाईक, तुषार पाटील, बाळासाहेब भुजबळ, अतुल चव्हाण, अमर इंदलकर, जगन्नाथ किर्दत, बाळासाहेब ढेकणे, जगन्नाथ जगदाळे, पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीत पदयात्रेचे स्वागत करण्यात आले. येथील विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय शिक्षणासाठी पुणे, मुंबई अथवा अन्य शहरांवर अवलंबून रहावे लागणार नाही. औद्योगिकीकरणालाही चालना देऊन रोजगार निर्मितीचे लक्ष्य असल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी याप्रसंगी केले.