गुप्तचर अधिकारी अंकीत शर्मा हत्या प्रकरणात चुकीचे वार्तांकन केल्याचा दावा
नवी दिल्ली : दिल्लीतील हिंसाचार आणि गुप्तचर अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्या प्रकरणात चुकीचे वार्तांकन करून एका विशिष्ठ धर्माची बदनामी केल्या बद्दल आणि जातीय तणाव वाढवल्याचा गुन्हा अमेरिकेतील वृत्तपत्र वॉल स्ट्रिट जर्नल विरोधात येथे दाखल करण्यात आला.
अंकीत यांचा भाऊ अंकूर याने जय श्रीरामच्या घोषणा देणाऱ्या जमावाने माझ्या भावाला मारले, असे सांगितल्याचे वृत्त वॉल स्ट्रिट जर्नलमध्ये प्रकाशित झाले होते. दरम्यान, प्रसारभारतीशी बोलताना अंकूर शर्मा म्हणाले, वॉल स्ट्रिट जर्नलशी मी असे काही बोललो नाही. हा माझ्या भावाला आणि माझ्या कुटुंबाला बदनाम करण्याचा कट आहे. वॉलस्ट्रिट जर्नल खोटे बोलत आहे.