पुणे – पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट संघटना आणि लायन्स् क्लब ऑफ पुणे रहाटणी यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित ‘लायन्स् ज्युनिअर करंडक’ १४ वर्षाखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत ज्ञानप्रबोधिनी विद्यालय संघ, एसएनबीपी रहाटणी संघ आणि एसबी पाटील पब्लिक स्कूल या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
रावेत येथील अॅचिव्हर्स क्रिकेट मैदान येथे सुरू असलेल्या स्पर्धेच्या सामन्यात आयुश येलवंडे याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर एसएनबीपी रहाटणी संघाने सेंट जोसेफ बेथनी स्कूलचा १० गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना सेंट जोसेफ बेथनी स्कूलचा डाव ४१ धावांवर गडगडला. आयुश येलवंडे याने ७ धावात ३ गडी बाद केले तर, अभिराज देशमुख याने तीन आणि सिद्धार्थ पटेल याने दोन गडी बाद केले. एसएनबीपी रहाटणी संघाने हे आव्हान ३.५ षटकात पूर्ण केले. सर्वेश नेहेरे याने नाबाद ८ धावा आणि श्रीरंग वर्तक याने नाबाद २० धावा करून संघाचा विजय साकार केला.
अविनाश महाडीक याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर एसबी पाटील पब्लिक स्कूलने जय हिंद हायस्कूलचा ७ गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा खेळताना जय हिंद हायस्कूलने १०१ धावा धावफलकावर लावल्या. सार्थक पवार (४१ धावा) आणि शरवरी खिलारी (२० धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला. एसबी पाटील पब्लिक स्कूल संघाने १४.५ षटकात हे लक्ष्य गाठले. अविनाश महाडीक याने नाबाद ३६ धावा आणि आयुश कांबळे याने ३१ धावांचे योगदान देत संघाला विजय मिळवून दिला.
U19 Asia Cup 2023 Semifinal : टीम इंडिया आशिया कपमधून बाहेर…
ध्रुव कुलकर्णी याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर ज्ञानप्रबोधिनी विद्यालय संघाने सीएमएस इंग्लिश मिडीयम स्कूलचा २१ धावांनी पराभव करून स्पर्धेत शानदार सुरूवात केली.