India vs Bangladesh, U19 Asia Cup 2023 Semifinal : – अरीफुल इस्लाम व अहरार आमिन यांच्या सहजसुंदर फलंदाजीच्या जोरावर बांगलादेशने 19 वर्षांखालील आशिया कप क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाचा 4 गडी राखून पराभव केला. या विजयाच्या जोरावर बांगलादेश संघाने यंदाच्या Asia Cup 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक विजेते ठरलेल्या भारतीय संघाला यंदाच्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्यातही यश आले नाही.
U19 Asia Cup 2023 Semifinal : मुशीर-मुरुगनची अर्धशतके; टीम इंडियाचे बांगलादेशसमोर 189 धावाचं लक्ष्य…
मुरुगन अभिषेक व मुशीर खान यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना 42.4 षटकांत सर्व गडी गमावून 188 धावा केल्या होत्या. या दोन फलंदाजांचा अपवाद वगळता भारताच्या अन्य फलंदाजांनी साफ निराशा केली. बांगलादेशकडून मारुफ म्रीधाने सर्वाधिक 4 गडी बाद केले. परवेज जीवन व रोहानंत बोरसन यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
भारताने विजयासाठी दिलेल्या 189 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेश संघाची एकवेळ 3 बाद 34 अशी बिकट स्थिती बनली होती. त्यानंतर अरीफुल व अहरार यांनी भक्कम फलंदाजी केली. या जोडीने शतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. अरीफुलने अर्धशतक साकार केले मात्र, त्याला शतक पूर्ण करता आले नाही. त्याने 90 चेंडूत 9 चौकार व 4 षटकारांसह 94 धावांची खेळी केली. त्यानंतर अहरारने महफिजुर रेहमानच्या साथीत जबाबदारीने फलंदाजी केली. मात्र विजयासाठी अवघ्या 2 धावांची गरज असताना अहरार 44 धावांवर बाद झाला. यावेळी महफिजूरने (नाबाद 3) परवेज जीवनच्या (नाबाद2) साथीत 43 व्या षटकात 6 गडी गमावून 189 धावा करत संघाचा विजय साकार केला.
Bangladesh-U19 clinches victory by 4 wickets against India-U19, securing a thrilling ticket to the finals. The cricketing arena buzzes with excitement as Bangladesh charts their course to championship glory. #ACCMensU19AsiaCup #ACC pic.twitter.com/OBYEu5MbxP
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) December 15, 2023
आता, उपांत्य फेरीच्या अन्य लढतीत अमिरातीने बलाढ्य पाकिस्तानवर 11 धावांनी मात करत अंतिम फेरी गाठली. आता अंतिम फेरीत अमिराती व बांगलादेश यांच्यात विजेतेपदाची लढत येत्या रविवारी होणार आहे.