मांडवगण फराटा – वेळेत उपचार मिळाल्याने सर्पदंश झालेल्या दोन तरुणांचे प्राण वाचले. दोन ते तीन दिवसापुर्वी मांडवगण फराटा (ता. शिरूर )येथील रणजित रंगनाथ वराळे व वडगाव रासाई येथील अमोल भाऊसाहेब निंबाळकर या तरुणांना सर्पदंश झाल्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी घटना घडली होत्या.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि मांडवगण फराटा येथील रणजित वराळे हा तरुण शेतामध्ये गुरांचा चारा काढत असताना त्याच्या पायाच्या अंगठ्याला सर्पदंश झाला. तर वडगाव रासाई येथील अमोल निंबाळकर देखील जनावरांचा काढून ठेवलेला चारा उचलत असताना त्याच्या मांडीला सर्पदंश झाला. वेळेमध्ये कुटुंबाने व मित्रांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याने व वेळेत उपचार मिळाल्याने या दोघांची प्रकृती आता चांगली आहे.