पुणे – पतीने पत्नीचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना वाघोली गावातील लेबर कॅम्पमध्ये घडली. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
अनु राजू मिर्झा (28, रा.मॅजेस्टिक सोसायटी लेबर कॅम्प, वाघोली) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी राजून मिर्झा याला अटक करण्यात आली आहे.तर राजेश पुनाराम मिर्झा(30, रा.वाघोली, मुळ छत्तीसगड) याने फिर्याद दिली आहे.
फिर्याद राजेशचा आरोपी राजु हा छोटा भाऊ आहे. तर मयत ही वहिणी लागते. ती पतीसोबत असलेल्या कोैटूंबिक वादामुळे फिर्यादीच्या कुटूंबासोबत रहात होती. याचा राग आरोपीस होता. तो सोमवारी पहाटे लेबर कॅम्पमधील फिर्यादीच्या पत्र्याच्या खोलीबाहेर आला. त्याने सोबत प्लॅस्टीकच्या पिशवीमध्ये चाकू आणला होता. त्याने पत्नीला बोलयाचे आहे म्हणून हाक मारत घराबाहेर बोलावून घेतले. यानंतर धारदार चाकू पोटात खुपसून तीचा खून केला. यातील फिर्यादी, आरोपी व मयत हे सर्व मजुरी काम करणारे असून मुळचे छत्तीसगडचे आहेत. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र तटकरे करत आहेत.