लोणी काळभोर -कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे बत्तीस वर्षीय करोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. या तरुणाच्या संपर्कात आलेले त्याचे अठरा महिन्यांचे बाळ, पत्नी व आईला तात्काळ होम क्वारंटाइन केले असून, तिघांचेही स्वॅब बुधवारी ( दि. 1) सकाळी तपासणीसाठी पुण्यातील शासकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत.
याचबरोबर उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील डाळींब रस्ता परिसरात एक बत्तीस वर्षीय तरुण करोना बाधित असल्याचे मंगळवारी दुपारी आढळून आले आहे. यामुळे मागील सहा दिवसातील उरुळी कांचन शहरातील रुग्णांची संख्या पाचवर पोचली आहे.