- सात ग्रामपंचायतींसह 190 जागा बिनविरोध
- 325 उमेदवार रिंगणात
वडगाव मावळ – मावळ तालुक्यातील 57 ग्रामपंचायतीच्या एकूण 515 जागापैकी 190 जागा बिनविरोध झाल्या. त्यामध्ये 7 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्याचबरोबर उर्वरित 325 जागांसाठी 746 उमेदवार रिंगणात असल्याची माहिती मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, नायब तहसीलदार रावसाहेब चाटे, संतोष सोनवणे आदींनी दिली. मावळ तालुक्यातील 50 ग्रामपंचायतीच्या 325 जागांसाठी कुठे दुरंगी तर कुठे तिरंगी सामना रंगणार आहे. याशिवाय 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे.
ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमानुसार सोमवारी (दि. 4) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. नवलाख उंब्रे, येलघोल, आंबेगाव, पाचाणे, कुसगाव (पवन मावळ), दारूंब्रे, आढे या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर उर्वरित 50 ग्रामपंचायतीच्या 325 जागांसाठी 746 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
ग्रामपंचायतनिहाय व बिनविरोध व निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार संख्या
नवलाख उंब्रे सर्व 13 जागा बिनविरोध, माळेगाव बुद्रुक : 5 बिनविरोध-4 जागांसाठी 9 उमेदवार, इंगळून : 4 बिनविरोध – 3 जागांसाठी 6 उमेदवार, खांड – 7 बिनविरोध – 2 जागांसाठी 6 उमेदवार, डाहुली : 7 जागांसाठी 15 जण रिंगणात, कशाळ : 2 बिनविरोध – 7 जागांसाठी 46, वडेश्वर : 1 बिनविरोध – 10 जागांसाठी 23 जण, कुसवली : 3 बिनविरोध – 4 जागांसाठी 10 जण, आढे : सर्व 7 जागा बिनविरोध, परंदवडी : 1 बिनविरोध – 8 जागांसाठी 16 जण, उर्से : 1 बिनविरोध, 10 जागांसाठी 29 जण.
सोमाटणे : 12 बिनविरोध – एक जागेसाठी 2 जण, धामणे – 9 जागांसाठी 18 जण, दारुंब्रे : सर्व 9 जागा बिनविरोध. गहूंजे : 2 बिनविरोध – 9 जागांसाठी 21 जण, सांगावडे : 4 बिनविरोध – 3 जागांसाठी 6 जण रिंगणात, आंबी : वारंगवाडी-गोळेवाडी या 2 नं वॉर्डातील तीनही उमेदवार बिनविरोध – 8 जागांसाठी 19 जण रिंगणात, माळवाडी : 10 बिनविरोध – एका जागेसाठी 2 जण रिंगणात, करंजगाव : 4 बिनविरोध – 5 जागांसाठी 17 जण, गोवित्री : एक बिनविरोध – 8 जागांसाठी 17 जण, साई : 4 बिनविरोध – 5 जागांसाठी 9 जण रिंगणात, घोणशेत : तीन बिनविरोध – 6 जागांसाठी 13 जण, चिखलसे : 3 बिनविरोध – 6 जागांसाठी 11 जण, खडकाळा : 17 जागांसाठी 43 जण.
कुसगाव खुर्द : 7 जागांसाठी 16 जण, टाकवे बुद्रुक : एक बिनविरोध – 12 जागांसाठी 36 जण रिंगणात, साते : 3 बिनविरोध – 8 जागांसाठी 20 जण, नाणे : 1 बिनविरोध – 8 जागांसाठी 16 जण, कांब्रे नामा : सहा बिनविरोध – तीन जागांसाठी 6 जण, वेहेरगाव : 2 बिनविरोध- 7 जागांसाठी 17 जण, ताजे : 5 बिनविरोध – 4 जागांसाठी 8 जण.
मळवली : दोन बिनविरोध – 7 जागांसाठी 20 जण, पाटण : दोन बिनविरोध – 7 जागांसाठी 17, कार्ला : 9 जागांसाठी 21, खांडशी : दोन बिनविरोध – 5 जागांसाठी 12, उकसान : 7 जागांसाठी 15 जण, शिरदे : 4 बिनविरोध – 3 जागांसाठी 10, तिकोणा : दोन बिनविरोध – 5 जागांसाठी 10, कोथुर्णे : चार बिनविरोध, 3 जागांसाठी 6, वारू : 9 जागांसाठी 20, मळवंडी ठुले : एक बिनविरोध – 6 जागांसाठी 12, आपटी : 5 बिनविरोध – दोन जागांसाठी 4, अजिवली : 7 जागांसाठी 14,
मोरवे : 6 बिनविरोध – एका जागेसाठी 2 जण, महागाव : 9 जागांसाठी 20, आंबेगाव : सर्व 7 जागा बिनविरोध, कुसगाव बुद्रुक : 17 जागांसाठी 37, कुरवंडे : एक बिनविरोध, 10 जागांसाठी 29, येलघोल : सर्व 7 जागा बिनविरोध, शिवली : तीन बिनविरोध – 6 जागांसाठी 12, येळसे : 7 जागांसाठी 14, बऊर : एक बिनविरोध – 8 जागांसाठी 17, पाचाणे : सर्व 9 जागा बिनविरोध, कुसगाव पमा : सर्व 7 जागा बिनविरोध, थुगाव : 3 बिनविरोध – 4 जागांसाठी 10, शिवणे : 3 बिनविरोध – 6 जागांसाठी 12, आढले खुर्द : 4 बिनविरोध – 5 जागांसाठी 10 जण रिंगणात आहेत.
दरम्यान, बंडखोरांना थांबविण्यात यश आले नसल्याने ग्रामपंचायती बिनविरोध होण्याची संख्या कमी झाली आहे. मावळात 7 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने आमदार सुनील शेळके या ग्रामपंचायतींना 11 लाख रुपयांचा निधी देणार आहेत.