मॉस्को – रशियातील सत्तारुढ युनायटेड रशिया पार्टीचे दोन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा एकाच दिवशी मृत्यू झाला आहे. निकोलाय बोरोत्सोव आणि झाशेरबेक उझदेनोव अशी या दोघांची नावे आहेत.
यातील उझदेनोव हे दीर्घकाळापासून आजारी होते. तर बोरोत्सोव हे आपल्या घरी मृतावस्थेत आढळले आहेत. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये युक्रेनवर आक्रमण केल्यापासून संदिग्ध परिस्थितीत अनेक प्रमुख रशियन लोकांचा मृत्यू मृत्यू झाले आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून पुतीन यांच्याशी संबंधित काही वरिष्ठ पदाधिकारी असलेल्या किमान 20 लोकांचा रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाला आहे.
यात काही पुतीन यांचे टीकाकार होते. या लोकांनी रशियाने युक्रेनवर हल्ला करण्यावर टीका केली होती. तर काही जण पुतीन यांचे राजकीय स्पर्धक होते.
युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकेने रशियातील ज्या नेत्यांवर निर्बंध घातले होते, त्यामध्ये या दोघांचाही समावेश होता. ते रशियातील अतिश्रीमंत सरकारी पदाधिकारी होते. त्यांची संपत्ती अंदाजे 550 दशलक्ष डॉलर इतकी प्रचंड आहे. तर उझदेनोव हे पर्यावरणशास्त्र, नैसर्गिक स्रोत आणि पर्यावरण संरक्षण यावरील रशियाच्या गृह समितीचे सदस्य होते.