रायपुर – छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात आज सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. त्यात एका महिला नक्षलवाद्याचाही समावेश आहे. नेमके किती नक्षलवादी या चकमकीत ठार झाले या विषयी पोलिसांमध्येच संभ्रमाचे वातावरण आहे. आधी त्यांनी दोन नक्षलवादी ठार झाल्याचे म्हटले होते पण आता त्यांनी एकच नक्षलवादी ठार झाल्याचे सांगितले आहे.
या जिल्ह्याच्यया गोंडेरास गावात पहाटे पाच वाजता सुरक्षा दलांच्या पथकाबरोबर नक्षलवाद्यांची ही चकमक झाली. सुरक्षा पथक या भागाची पहाणी करीत असताना अचानक त्यांच्यावर नक्षलवाद्यांच्या एका गटाने गोळीबार सुरू केला. त्यावेळी सुरक्षा पथकांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. त्यात हे दोन जण ठार झाले. घटनास्थळी पोलिसांना काही रायफली व दारूगोळाही आढळून आला आहे.