संयुक्तराष्ट्रे – भारताचे प्रतिनिधी जगजीत पवाडिया यांची संयुक्तराष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डावर दुसऱ्यांदा निवड झाली आहे. ते सन 2015 पासून या बोर्डाचे सदस्य आहेत. त्यांची सध्याची मुदत सन 2020 मध्ये संपत आहे. त्या जागेवर त्यांची आज पुन्हा निवड झाली. निवडणूक पद्धतीने हे पद भरले जाते त्यात भारताला अनेक देशांची साथ लाभली अशी माहिती भारताचे संयुक्तराष्ट्रांमधील कायम सदस्य सय्यद अकबरूद्दीन यांनी सांगितले.
पाच जागांसाठी एकूण पंधरा देशांचे प्रतिनिधी या निवडणुकीला उभे होते. त्या पदासाठी एकूण 54 देशांच्या प्रतिनिधींनी मतदान केले. त्यावेळी भारताला अनेक देशांचे पाठबळ लाभल्याने त्यांची निवड शक्य झाली असे ते म्हणाले. भारताला पाठिंबा देणाऱ्या देशांचे त्यांनी आभारही मानले आहेत. आपल्या फेरनिवडीबद्दल स्वत: पवाडिया यांनी संबंधीतांचे आभार मानले आहेत.