करोनाचा संसर्ग झाल्यानंतरही शुटिंग करून संपूर्ण युनिटला धोका निर्माण केल्याबद्दल गौहर खानवर “फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’ने दोन महिन्यांचे निर्बंध घातले आहेत. या संदर्भात गौहर खानविरोधात गुन्हेगारी स्वरूपाचे प्रकरणही दाखल करण्यात आले आहे.
View this post on Instagram
“तांडव’मधून लोकांच्या समोर आलेल्या गौहर खानविरोधात बृहन्मुंबई महापालिकेनेही साथ रोग कायद्याच्या उल्लंघनाचे प्रकरण दाखल केले आहे. करोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर तिने होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केलेला नाही, हे उघड झाले आहे. तिने करोना निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट खोटेपणाने मिळवला असल्याचाही आरोप आहे.
View this post on Instagram
करोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक नुकसानीने धास्तावलेल्या “फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’ने गौहर खानचे हे बेजबाबदार वर्तन अतिशय गांभीर्याने घेतले आहे. मंगळवारी झालेल्या संघटनेच्या बैठकीमध्ये गौहरवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला.
View this post on Instagram
सिने कर्मचाऱ्यांच्या या संघटनेने गौहरला कोणत्याही शुटिंगमध्ये दोन महिने सहभागी न होण्याचे निर्बंध घातले आहेत. या दोन महिन्यांनंतर कोणीही निर्माता, दिग्दर्शक गौहरला घेऊन काम करू शकेल की नाही, याचा निर्णय नंतर घेतला जाणार आहे. जर या दोन महिन्यात मुंबई पालिकेच्या हद्दीत गौहर खान कोणत्याही सिनेमा, सिरीयल, वेबसिरीजच्या शुटिंगमध्ये सहभागी झाली, तर तेथे फेडरेशनचे सदस्य कर्मचारी काम करणार नाहीत.