श्रीनगर – श्रीनगरच्या निवासी भागात शुक्रवारी सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. श्रीनगरच्या दनमार भागात सफकादल-सौरा रस्त्यावर एकेठिकाणी दहशतवाद्यांनी आश्रय घेतल्याची खबर मिळाल्यानंतर आज पहाटेच्या सुमाराला त्या भागाला वेढा देऊन जवानांनी तेथे सुरक्षा तपासणी हाती घेतली. त्यावेळी ही चकमक झाली.
त्यात हे दोन जण ठार झाले असून त्यांची ओळख अजून पटलेली नाहीं. त्यांनी ज्या घरात आश्रय घेतला होता त्या भागातील लोकांची आता चौकशी सुरू आहे. या भागात आणखी काही दहशतवादी लपले आहेत काय याची खातरजमा करण्यात आली. त्यासाठी कसून कॉम्बिंग ऑपरेशन राबवले गेले. ठार झालेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह स्थानिकांचे नाहीत असेही प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे.