मुंबई – जोगेश्वरी पोलिस स्थानकातील एक वरीष्ठ पोलीस निरीक्षक अटकेतील एका गुंडाला त्याच्या वाढदिवसानिमीत्त केक भरवत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने या पोलिस निरीक्षकाच्या कृत्याच्या चौकशीचा आदेश देण्यात आला आहे. महेंद्र नेर्लेकर असे या निरीक्षकाचे नाव असून त्यांनी दानिश शेख नावाच्या गुंडाला त्याच्या वाढदिवसानिमीत्त केक भरवला होता.
दानिश शेखवर असंख्य गुन्हे दाखल आहेत. त्यात खुनाच्या प्रयत्नासह अनेक गंभीर गुन्ह्याचा समावेश आहे. या प्रकरणात त्यांच्याशी संपर्क केला असता नेर्लेकर म्हणाले की हा व्हिडीओ जुना आहे. आणि तो कोठडीतील नसुन त्याच्या निवासस्थानाच्या भागाचा आहे.
मी त्याच्या सोसायटीत पाडून टाकण्यात आलेल्या बांधकामाच्या पहाणीसाठी गेलो होतो.त्यावेळी तेथील काहीं ज्येष्ठ नागरीकांनी मला सोसायटीच्या ऑफिस मध्ये येण्याचा आग्रह धरला. तेथे दानिश शेख हाहीं उपस्थित असेल याची मला कल्पना नव्हती. साकीनाका विभागाचे सहायक पोलिस आयुक्त या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.