मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात दोन ठार

पालघर – मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी उड्डाणपुलावरील वळणावर मुंबईच्या दिशेने जात असताना भीषण अपघात घडला. या अपघातामध्ये दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार हे उड्डाणपुलाच्या कठड्याला ठोकून खाली पडला आणि त्याच्या डोक्‍याला गंभीर मार लागला.

सिद्धेश परब वय 22 रा. मीरारोड याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मागे बसलेल्या सनद यादव याला देखील गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्याची प्रकृती ठीक असल्याची माहिती डॉक्‍टरांकडून देण्यात आली आहे. तर या अपघातानंतर आणखी एकाचा बाईक रायडरचा मृत्यू झाला आहे.

काही अंतरावर महालक्ष्मी ते आंबोली दरम्यान आणखी एका बाईक रायडरचा अपघातात मृत्यू झाला. मनीष राऊत (वय 38, रा. पालघर) याचादेखील अपघातात मृत्यू झाला आहे. ट्रेलरने धडक दिल्याने अपघात त्याचा मृत्यू झाला.

या दोन्ही अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन्ही बाईक रायडरचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

दरम्यान, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सध्या अपघाताची मालिका सुरू आहे. नेहमीप्रमाणे रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने अनेक बाईक रायडिंगसाठी निघतात. यात तरुणांचा गाडीच्या वेगावर लक्ष नसतें. त्यामुळे अशा अपघाताच्या वारंवार घटना समोर येत असल्याचेही बोलले जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.