सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात शनिवारी (दि. 9) रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार आणखी 59 नागरिकांना करोनाचा संसर्ग झाला आहे, तर गेल्या 24 तासांमध्ये दोन बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी रविवारी दिली. त्यामुळे एकूण करोनाबळींनी 1800 चा आकडा पार केला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर अजूनही सव्वातीन टक्के एवढा चिंताजनक आहे.
सातारा तालुक्यामध्ये सातारा शहरात सदरबझार तीन, शुक्रवार पेठ, इतरत्र एक, तामजाईनगर, शाहूपुरी, कण्हेर, नागठाणे प्रत्येकी एक, कराड तालुक्यातत मलकापूर दोन, गोवारे, ढेबेवाडी, बनवडी, हेळगाव प्रत्येकी एक,
फलटण तालुक्यात डोंबाळेवाडी दोन, फलटण शहर, तोंडले, खराडे प्रत्येकी एक, खटाव तालुक्यात नेर, ललगुण प्रत्येकी दोन, खटाव, बुध, पळसगाव, वर्धनगड, जांब, पुसेसावळी प्रत्येकी एक, माण तालुक्यात मलवडी दोन, म्हसवड, पिंपरी प्रत्येकी एक, कोरेगाव तालुक्यात रहिमतपूर तीन, कोरेगाव एक,
खंडाळा तालुक्यात शिरवळ तीन, लोणंद दोन, मोर्वे, पळशी, नायगाव प्रत्येकी एक, महाबळेश्वर तालुक्यात पाचगणी तीन, पाटण तालुक्यात पाटण शहर एक, वाई तालुक्याती कडेगाव एक, जावळी तालुक्यात मेढा दोन, इतर दोन, इतर जिल्ह्यांमधील सांगली दोन, मुंबई एक, असे 59 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
दरम्यान, क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना नरवणे, ता. माण येथील 70 वर्षीय पुरुष व खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना महाबळेश्वर येथील 56 वर्षीय पुरुष, अशा दोन बाधितांचा मृत्यू झाल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख 94 हजार 684 एवढ्या चाचण्या झाल्या असून त्यात 55 हजार 211 बाधित आढळले आहेत, तर करोनाबळींची एकूण संख्या 1801 झाली आहे.