दुबई – इराणमध्ये माहसा (iran-israel war) आमिनीच्या मृत्यूशी संबंधित घटनांचे वार्तांकन (reporting) केल्याचा ठपका ठेवून दोन पत्रकारांना (journalists) 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शिक्षा सुनावण्यात आलेले हे दोन्ही पत्रकार गेल्या वर्षभरापासून तुरुंगातच आहेत.
इराणमध्ये सप्टेंबर 2022 मध्ये माहसा आमिनी नावाच्या युवतीला हिजाब व्यवस्थित परिधान न केल्याबद्दल इराणच्या नैतिक सुरक्षा दलांनी अटक केले होते. पोलिसांच्या कोठडीमध्येच या युवतीचा मृत्यू झाला होता.
त्यानंतर देशभर मोठे आंदोलन उसळले होते. या आंदोलनाला परदेशातूनही मोठे पाठबळ मिळाले होते. त्यामुळे हिजाबविरोधी आंदोलन काही दिवसातच आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचले होते.
या सर्व घटनाक्रमांचे वार्तांकन या दोन्ही पत्रकारांनी परदेशी माध्यमांसाठी केल्याचा ठपका या दोन्ही पत्रकारांवर ठेवण्यात आला होता. सुनावण्यात आलेल्या शिक्षेला आगामी 20 दिवसात आव्हान दिले जाऊ शकणार आहे.
माध्यमांमधून फोडली होती या प्रकरणाला वाचा…
निलोफर हमेदी या पत्रकार महिलेने केलेल्या वार्तांकनात माहसा आमिनीने हिजाब सैल बांधल्याने ती अटक झाली होती, असे उघड केले होते. तर इलाही मोहम्मदी या पत्रकाराने माहसा आमिनीच्या दफनविधीचे वार्तांकन केले होते.
न्यूयॉर्क स्थित कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्टने या दोन पत्रकारांना शिक्षा देण्याच्या निर्णयाचा निषेध केला आणि त्यांच्या तात्काळ सुटकेच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला.