नवी दिल्ली : भारताचे माजी फिरकी गोलंदाज बिशनसिंग बेदी यांचे निधन झाले. बिशन सिंग यांनी वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. (legendary spinner Bishan Singh Bedi passes away at 77) ते बरेच दिवस आजारी होते. 1970 च्या दशकात आपल्या फिरत्या चेंडूंनी फलंदाजांना चकित करणाऱ्या बिशन सिंग यांनी 22 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले.
बेदी यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द 12 वर्षे चालली. बेदी यांनी भारतासाठी एकूण 77 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. यामध्ये त्यांनी 273 विकेट घेतल्या होत्या. भारतीय कसोटी इतिहासातील सर्वोत्तम फिरकीपटूंमध्ये बेदी यांची गणना केली जाते. त्यांनी आपल्या गोलंदाजीच्या जोरावर अनेक सामन्यांमध्ये भारताला संस्मरणीय विजय मिळवून दिले.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली सर्वोत्तम कामगिरी…
बेदी हे 1966 ते 1979 या काळात भारताकडून कसोटी क्रिकेट खेळले. बेदी यांनी 1969-70 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोलकाता कसोटीत एका डावात 98 धावांत सात विकेट घेतल्या होत्या. ही त्याची एका डावातील सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्याच वेळी, जर आपण सामन्याबद्दल बोललो तर, 1977-78 मध्ये पर्थच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 194 धावांत एकूण 10 विकेट्स घेतल्या होत्या. 1976 मध्ये कानपूर कसोटीत त्याने न्यूझीलंडविरुद्ध कसोटीतील एकमेव अर्धशतक झळकावले होते.
The BCCI mourns the sad demise of former India Test Captain and legendary spinner, Bishan Singh Bedi.
Our thoughts and prayers are with his family and fans in these tough times.
May his soul rest in peace 🙏 pic.twitter.com/oYdJU0cBCV
— BCCI (@BCCI) October 23, 2023
भारतीय संघाचे नेतृत्वही केले…
बिशनसिंग बेदी यांनाही भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. 1976 मध्ये त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. महान क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडी यांच्या जागी बेदी यांना कर्णधार बनवण्यात आले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताला पहिला विजय 1976 च्या दौऱ्यात पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध मिळाला होता. यानंतर, मायदेशात इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 3-1, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील कसोटी मालिकेत 3-2 आणि पाकिस्तान दौऱ्यावरील कसोटी मालिकेत 2-0 ने पराभूत झाल्यानंतर त्याला कर्णधारपदावरून दूर करण्यात आले. त्यांच्यानंतर सुनील गावस्कर कर्णधार झाले.
आंतरराष्ट्रीय कारकीर्द….
त्यांनी भारतासाठी 67 कसोटी सामन्यांमध्ये 266 विकेट घेतल्या. त्यांनी 15 वेळा एका डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आणि एकदा सामन्यात 10 विकेट्सही घेतल्या. त्याचबरोबर त्यानी 10 एकदिवसीय सामने खेळताना सात विकेट घेतल्या आहेत.