दुबई :- भारतीय संघाचा माजी आंतरराष्ट्रीय धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग याच्यासह भारताच्या माजी आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू डायना एडल्जी यांचा आयसीसीने हॉल ऑफ फेममध्ये समावेश केला आहे. या दोन भारतीय खेळाडूंव्यतरीक्त श्रीलंकेचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अरवींदा डीसील्व्हा याचाही हॉल ऑफ फेममध्ये दाखल करत सन्मान केला आहे.
2021 सालानंतर आतापर्यंत आयसीसीने गेल्या चार ते पाच वर्षांत हॉल ऑफ फेममध्ये नव्याने कोणाचाही समावेश केला नव्हता. महान क्रिकेटपटू विनू मांकड यांचा 2021 साली हॉल ऑफ फेममध्ये समावेश केला होता. त्यानंतर दोन वर्षांनी सेहवाग, एडल्जी व डीसील्व्हा यांचा समावेश करण्यात आला आहे.
A trailblazer on and off the field 🌟
More on Diana Edulji’s pioneering career 📲 https://t.co/FXjqkNDF7k pic.twitter.com/GpGzKNe6vM
— ICC (@ICC) November 13, 2023
आता हॉल ऑफ फेमममध्ये या तीन खेळाडूंच्या समावेशानंतर एकूण संख्या 112 झाली आहे. त्यात नऊ भारतीय क्रिकेटपटूंची नावे आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला 2019 मध्ये हा सन्मान मिळाला होता.
Virender Sehwag was a game-changer with the bat and the former India opener is now a much-deserved member of the ICC Hall of Fame 💥🏏
More on his achievements and journey 👉 https://t.co/wFLhmrPxJA pic.twitter.com/L0vJrKPdgt
— ICC (@ICC) November 13, 2023
राहुल द्रविडला तर त्यापूर्वी 2018 साली आणि अनिल कुंबळेला 2015 साली हा सन्मान मिळाला होता. बिशनसिंग बेदी आणि सुनील गावसकर यांना 2009 साली हा गौरव मिळाला. महान कर्णधार कपील देव यांचाही 2010 साली यात समावेश करण्यात आला.
हॉल ऑफ फेमममधील भारतीय
1. बिशनसिंग बेदी – 2009
2. सुनील गावसकर – 2009
3. कपिल देव -2010
4. अनिल कुंबळे – 2015
5. राहुल द्रविड – 2018
6. सचिन तेंडुलकर – 2019
7. विनू मांकड – 2021
8. डायना एडल्जी – 2023
9. वीरेंद्र सेहवाग – 2023