नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीने (Bjp) मध्यप्रदेशात कॉंग्रेसचा (MP Congress) जाहीरनामा चोरला असा आरोप कॉंग्रेसचे राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांनी केला. या आठवड्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) भाजपने आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला.तो कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यावरूनच उचलण्यात आला आहे असे ते म्हणाले.
असाच आरोप कॉंग्रेस नेते कलमनाथ (kamalnath) यांनीही केला आहे. भाजपकडे मध्यप्रदेशच्या विकासाचे कोणतेही व्हिजन नाही, त्यामुळे त्यांनी कॉंग्रेसच्या जाहीरनाम्याची कॉपी केली आहे असेही दिग्विजयसिंह यांनी म्हटले आहे. निवडणूक तोंडावर आली असताना त्यांनी शेवटीशेवटी घाईघाईने हा जाहीरनामा प्रकाशित केला आहे.
भाजप आणि कॉंग्रेसच्या (bjp vs Congress) जाहीरनाम्यातील समानतेबद्दल विचारले असता सिंग यांनी एएनआयला सांगितले की, “ज्यांनी आमचा जाहीरनामा चोरला आहे आणि तो स्वतःचा म्हणून जाहीर केला आहे. त्यामुळे हे दोन्ही जाहीरनामे एकसारखे दिसत आहेत. पण त्यांनी आमच्या जाहीरनाम्याची चोरी केल्याने हे घडले आहे असे ते म्हणाले.
संकल्प पत्र म्हणून प्रकाशित करण्यात आलेल्या या जाहीरनाम्याला ‘मोदी की हमी, भाजपा का भरोसा, (Modi ki hami) असे नाव देण्यात आले. जाहीरनाम्यात पक्षाने दहा प्रमुख हमी दिल्या आहेत.दिग्विजय यांच्या वक्तव्यानंतर दोन्हही पक्षांच्या जाहीरनाम्याचा जोरदार चर्चा सुरु आहे.