Virender Sehwag’s Son Aaryavir : भारतीय क्रिकेट संघातील वीरेंद्र सेहवागचे नाव कोणीही विसरू शकत नाही. त्याने भारतीय क्रिकेटमध्ये दिलेल्या योगदानामुळे भारतीय क्रिकेटचे नाव खूप उंचावले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज आणि दोनदा त्रिशतक करणारा एकमेव भारतीय फलंदाज आहे.
सेहवागने त्याच्या काळात फलंदाजीची शैली बदलली. जेव्हा तो फलंदाजीसाठी मैदानावर यायचा तेव्हा त्याच्यासमोर उभा असलेला गोलंदाज सामन्याच्या पहिल्या षटकाचा पहिला चेंडू टाकायला घाबरत असे, कारण सेहवाग अनेकदा सुरूवातीलाच चौकार किंवा षटकार मारत असे. आता सेहवाग आपल्या मुलाला आपल्यासारखा बनवत आहे.
सेहवागच्या मुलाची बॅटिंग करतानाचा व्हिडीओ व्हायरल..
वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवागचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याची फलंदाजी पाहून लोक( क्रिकेट चाहते) त्याला टीम इंडियाचा पुढचा सेहवाग म्हणत आहेत. या व्हिडिओमध्ये फलंदाजी करताना सेहवागच्या मुलाचे अप्रतिम फूटवर्क दिसत आहे. तो आपल्या पायांचा उत्तम वापर करून शॉट्स खेळताना दिसतो आहे. त्याची फलंदाजी पाहून त्याच्यात सेहवागची झलक नक्कीच पाहायला मिळते.
लोकांनी केल्या मजेशीर कमेंट्स…
सेहवागच्या मुलाच्या फलंदाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्याच्या व्हिडिओवर चाहते खूप मजेदार कमेंट करत आहेत. काही लोकांनी कमेंटमध्ये म्हटले की, जैसा बाप था, वैसा ही बेटा भी है. (जसा बाप होता,तसाच पोरगापण आहे.)
Virender Sehwag ‘s son is having footwork. pic.twitter.com/eQabQwJn5L
— Sunil the Cricketer (@1sInto2s) November 26, 2023
त्याच वेळी, काही लोक म्हणाले की, “तो 2027 च्या विश्वचषकात सलामीला येण्यासाठी तयारी करत आहे का, किंवा तो तयारी करू शकतो?”
Virender Sehwag ‘s son is having footwork. pic.twitter.com/eQabQwJn5L
— Sunil the Cricketer (@1sInto2s) November 26, 2023
त्याच वेळी, काहींनी सांगितले की, तो अगदी त्याच्या वडिलांसारखाच खेळत आहे. त्याच्या वडिलांप्रमाणेच, मुलाचे फलंदाजीत फटका मारण्याचे टायमिंग उत्कृष्ट असल्याचे दिसते. आता त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये येण्यासाठी दादा (सौरव गांगुली) सारखा कर्णधार हवा आहे, जो सेहवागसारखा त्याच्यावर विश्वास दाखवू शकेल.
Virender Sehwag ‘s son is having footwork. pic.twitter.com/eQabQwJn5L
— Sunil the Cricketer (@1sInto2s) November 26, 2023
विरेंद्र सेहवागची क्रिकेट कारकिर्द
विरेंद्र सेहवागने त्याच्या कारकिर्दमध्ये 104 कसोटी, 251 एकदिवसीय, 19 टी 20 सामने खेळला आहे. त्यानं टेस्टमध्ये 23 शतकांसह 8 हजार 586 धावा, एकदिवसीय सामन्यात 15 शतकांसह 8 हजार 273 धावा आणि 19 टी 20 सामन्यात 394 धावा केल्या आहेत.