कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातील मालेगावात रस्त्यात शेकोटी पेटवल्याच्या कारणावरून सोमवारी रात्री दोन गटात तलवारीसह लोखंडी पाईपस आणि गजाच्या वापरानेअ झालेल्या तुंबळ हाणामारीत पाच जण जखमी झाले आहेत. यातील तिगांची प्रकृती गंभीर आहे. 8 जणांवर परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
माले येथील बिरोबा मंदिराजवळील सरकारी दवाखान्याजवळच्या दोन परिवारात पूर्वीपासून रस्त्याच्या कारणावरून वाद आहे. त्याचा रोष मनात ठेऊन हे परिवार एकमेकांशी बोलत नव्हते. हा वाद गावस्तरावर अनेकवेळा मिटवण्याचा प्रयत्न झाला. परंतु सोमवारी रात्री या परिवारांमध्ये रस्त्यात शेकोटी केल्याने व रस्त्यात गाडी अडवल्याने वाद उफाळून आला.
आमदार रवी राणांसह 16 कार्यकर्त्यांची दिवाळी तुरूंगात; नवनीत राणांचे तुरूंगाबाहेर धरणे आंदोलन
गणपती बाबू बादरे यांच्या फिर्यादीनुसार प्रताप शिवाजी बादरे याने रस्त्यावर शेकोटी पेटवली असता तुकाराम रंगराव वगरे आणि विकास तुकाराम वगरे यांनी रस्त्यात शेकोटी का केली? यावरून वाद घालून मारामारी केली. त्यानंतर बादरे परिवार वगरे परिवाराला जाब विचारावयास गेले असता तुकाराम वगरे हातात तलवार घेऊन व त्यांची दोन मुले विकास व राहुल हातात लोखंडी पाईप व गज घेऊन फिर्यादीच्या दारात जाऊन मारहाण केली.
काबुल विद्यापीठ हल्ल्यातील मास्टरमाईंडला अटक; धक्कादायक माहिती उघडकीस
यामध्ये शिवाजी बाबू बांदरे, गणपती बाबू बादरे यांना हात-पाय, डोक्यावर वर्मी घाव लागल्याने शिवाजी बाबू बांदरे हे गंभीर जखमी झाले. गणपती बादरे यांच्या फिर्यादीनुसार तुकाराम वगरे, विकास व राहुल वगरे यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.
भारतीयांना शक्यतो करोना लसीची गरज पडणार नाही; ‘एम्स’च्या डाॅक्टरांचा दावा