लातूर – देव दर्शन घेऊन परत जात असताना कारने उभा असलेल्या ट्रकला धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. तर कारमधील इतर गंभीर जखमी झाले आहेत. मृत्यू झालेल्या भावांपैकी एकजण सोलापूर येथील मुख्यालयात पोलीस कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होता. हा अपघात पंढरपूर – मोहोळ रस्त्यावर झाला.
दयानंद अण्णाराव बेल्लाळे, वय 30 असे अपघातात मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून सचिन आण्णाराव बेल्लाळे, वय 32 असे मृत्यू झालेल्या दुसऱ्या भावाचे नाव आहे. दीपाली अण्णाराव बेल्लाळे ,स्वाती सचिन बेल्लाळे, मुलगी त्रिशा व मुलगा श्लोक अशी जखमींची नावे आहेत. जखमींना सोलापूर येथील खाजगी सीएनएस या हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हे सर्व रोकडा सावरगाव येथील रहिवासी आहेत.