जालना – जनावरांसाठी कुट्टी मशीन मधून चारा बारीक करीत असताना शॉक लागून दोन चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना भोकरदन तालुक्यातील लिंगेवाडी गावात घडली आहे. पवन गजानन घोडे (वय 22), सचिन रामकीसन घोडे (वय 23) असे या घटनेत मृत्यु झालेल्या दोन चुलत भावांची नावे आहेत.
घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी त्यांना तात्काळ भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांना मृत घोषित केले. ऐन सणासुदीच्या काळात घडलेल्या या दुर्दैवी घटनेने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.