कल्याण – सध्या आयपीएल 2022चा सीझन सुरु आहे. या दरम्यान अनेकजण आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावत आहे. बेकायदा सट्टा लावलेल्या दोघांना कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. भावेन अमन आणि मयुर ब्यास (दोघेही राहणार मुलुंड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील बोरगांवकर कॉम्प्लेक्समध्ये ऑनलाईन पद्धतीने सट्टा लावला जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे कल्याण महात्मा फुले पोलिसांनी छापा टाकला असता आयपीएलचा टी-20 मॅच सुरु होती. आरसीबी आणि आरआर या दोन संघामध्ये सुरु असलेल्या मॅचवर सट्टा लावला जात होता.
या प्रकरणी पोलिसांनी भावेन अमन आणि मयुर ब्यासला अटक केली आहे. दोघांकडून ऑनलाईन सट्टा लावण्यासाठी लागणारी सामग्री जप्त केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 13 जणांना आरोपी केले आहे. अन्य आरोपींचा शोध सुरु आाहे.