मयंक यादवच्या स्पीडवर प्रिती झिंटा फिदा ! ‘डिंपल गर्ल’च्या रिऍक्शनची सोशल मीडियावर चर्चा

Mayank Yadav Preity Zinta Reaction : आयपीएल 2024 च्या 11 व्या सामन्यात, लखनऊ सुपर जायंट्स वेगवान गोलंदाज मयंक यादवचे नाव पंजाब किंग्ज विरुद्ध आयपीएल इतिहासात नोंदवले गेले. या युवा वेगवान गोलंदाजाने आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील सर्वात वेगवान गोलंदाजी करून केवळ फलंदाजांनाच घाबरवले नाही, तर आपल्या संघाचा विजय निश्चित करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली.मयंकची जबरदस्त बॉलिंग पाहून पंजाब किंग्जची मालकीण प्रीती झिंटाही त्याचे कौतुक केल्याशिवाय राहू शकली नाही.
मयंक यादवने IPL 2024 मध्ये आतापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू (155.8 kmph) टाकून फलंदाज आणि चाहत्यांना देखील आश्चर्यचकित केलं. 150 च्या वेगाने गोलंदाजी करताना त्याने सामन्यादरम्यान तीन महत्त्वपूर्ण विकेट्सही घेतल्या. | Mayank Yadav Preity Zinta Reaction
मयंक यादव आयपीएल पदार्पणात चमकला
मयंकने आपल्या चार षटकांत केवळ २७ धावा देत महत्त्वाचे 3 बळी घेतले. त्याच्या बळींमध्ये धोकादायक फलंदाज जॉनी बेअरस्टो आणि प्रभसिमरन सिंग यांचा समावेश होता. त्याच्या शॉर्ट डिलिव्हरीमुळे दोघेही फसले. नंतर त्याने जितेश शर्माला त्याच्याच एका शॉर्ट बॉलवर बाद केले. त्यानंतर प्रीती झिंटानेही मयंकचे कौतुक केले.
प्रिती झिंटा म्हणाली..
प्रीती झिंटाने तिच्या एक्स हँडलवर मयंक यादवसाठी लिहिले, “21 वर्षीय मयंक यादवचे अशा प्रभावी आयपीएल पदार्पणासाठी अभिनंदन! खुप छान.. IPL 2024 चा सर्वात वेगवान चेंडू 155.8 किमी प्रतितास, पंजाब किंग्सला त्याच्या या खेळीने नक्कीच पुढेही खूप फायदा होईल. दमदार खेळला LSG!” | Mayank Yadav Preity Zinta Reaction
Congratulations to 21 year old Mayank Yadav for such an impressive IPL debut ! Wow !!! The fastest ball of IPL 2024 !!! 155.8 kmph 🔥🔥 Time for @PunjabKingsIPL to re look at our game & come back stronger. Well played LSG ! #LSGvPBKS #Mayankyadav
— Preity G Zinta (@realpreityzinta) March 30, 2024
GT vs SRH : ओपनर्स लगेच तंबूत परतले.. 10 ओव्हर्सनंतर सनरायझर्सची स्थिती काय ? वाचा..





