याचिकेच्या खर्चापोटी 50 लाख रूपये भरपाई देण्याचाही दिला आदेश
बेंगळुरू – केंद्र सरकारने ट्विटरची काही खाती ब्लॉक करण्याची सुचना ट्विटर या सोशल मिडीया कंपनीला दिली होती.त्या विरोधात ट्विटर कंपनीने कर्नाटकच्या उच्च न्यायालयात दाखल केली याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे.
केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ट्विटरला अनेक खात्यांवरील मजकूर आणि काही खातीच बंद करण्याचा आदेश दिला होता.
न्यायमूर्ती कृष्णा एस दीक्षित यांच्या एक न्यायाधिशांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. या याचिकेत गुणवत्तेच्या आधारावर विचार करण्याचा मुद्दा नाही असे नमूद करीत न्यायालयाने ही या यचिका फेटाळून लावताना ट्विटरला 50 लाख रूपयांचा भरपाईही देण्याचा आदेश दिला आहे.
येत्या 45 दिवसांत ही रक्कम कर्नाटकच्या विधी सेवा प्राधिकरणाकडे जमा करण्यास सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारला संबंधीत खाती किंवा काही ट्विट ब्लॉक करण्याचा अधिकार आहे असे मतही न्यायाधिशाने नोंदवले आहे.