नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे ट्विटर अकाउंट तात्पुरते बंद करण्यासाठी मोदी सरकारकडून दबाव आणला गेल्याचा आरोप कॉंग्रेसकडून करण्यात आला आहे आज सकाळी ट्विटरनं काँग्रेसच्या ५ नेत्यांची अकाऊंट्स लॉक केल्यानंतर आता थेट काँग्रेस पक्षाचंच मुख्य अकाऊंट ट्विटर इंडियानं लॉक केलं आहे.
महाराष्ट्राचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राहुल गांधींच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवत ‘मैं भी राहुल’, असं ट्विट केलं होतं. राहुल यांनी नियमांचं भंग करणारा फोटो शेअर केला होता, त्याच फोटोला पाठिंबा किंवा भूमिकाला पाठिंबा दर्शवणारं ट्विट बाळासाहेब थोरात यांनी केल्याने त्यांचंही ट्विटर अकाऊंट लॉक करण्यात आलं आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांनी दिल्ली येथील दलित अल्पवयीन मुलीवरील कथित बलात्कार व हत्या प्रकरणामध्ये मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती.
यानंतर त्यांनी याबाबतचा फोटो आपल्या ट्विटर खात्यावर पोस्ट केला होता. राहुल गांधींच्या या पोस्टवर, बलात्कार व हत्या प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांची ओळख गुप्त ठेवण्यात येते. याचे राहुल गांधी उल्लंघन केले असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने ट्विटर इंडियाला नोटीस पाठत बलात्कार पीडितेची ओळख जाहीर करणारे ट्विट हटवण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता राहुल गांधी यांचे ट्विटर खाते तात्पुरते निलंबित करण्यात आले.