संगमनेर, (प्रतिनिधी) – संगमनेर हा भाईचाऱ्याचा नारा देणारा तालुका आहे . हिंदु-मुस्लिमसह सर्वधर्मीय लोक येथे एकत्रित राहत असल्यानेच तालुक्याची प्रगती झाली असून, माजी महसूलमंत्री व तालुक्याचे भाग्यविधाते आ.बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यात हिंदू -मुस्लिम बंधुभाव कायम टिकून ठेवला असल्याची भावना सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी व्यक्त केली.
रमजान ईद निमित्ताने धांदरफळ बु येथील ईदगाह मैदानावर ईदची नमाज अदा झाल्यानंतर सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात,अनिलराव काळे,उपाध्यक्ष संतोष हासे, जिल्हा परिषद सदस्य रामहारी कातोरे, शुभम घुले, स्वदेशचे दत्ता कासार, नवनाथ कातोरे,
अदिनाथ खुर्पे आदींनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते गणीभाई तांबोळी व बालमभाई तांबोळी यांनी मान्यवरांचा सन्मान केला.
याप्रसंगी सलिम मोमीन,आयुब मोमीन, रफिक अत्तार,उस्मान शेख, सादिक मणियार,माजीद अत्तार,जुबेर मोमीन,डॅा.फिरोज तांबोळी, मुस्लीम सेवा संघाचे अफसर तांबोळी, पत्रकार अल्ताफ शेख उपस्थित होते. मान्यवरांना मुस्लिम समाजाचे वतीने शिरखुर्मा देण्यात आला.