इराणचे नेते आयतुल्ला अली खामेनी यांचे ट्विटर अकाउंट बंद

तेहरान – अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संदर्भाने वादग्रस्त ट्‌विट केल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी यांचे ट्‌विटर अकाउंट ट्‌विटरने बंद केले आहे. खामेनी यांनी केलेल्या ट्‌विटमध्ये ट्रम्प हे उंचावरून उडणाऱ्या लढाऊ विमानांच्या सावलीत गोल्फ खेळताना दर्शवणारा फोटो पोस्ट केला होता.

ट्रम्प यांनी अध्यक्षपदावर असताना इराणच्या लष्कराचे कमांडर कासेम सुलेमानी यांच्यावर ड्रोन हल्ला करण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या हल्ल्यानुसार सुलेमानी यांची हत्या झाल्यावर इराणने सूड घेतला जाईल, असा इशारा दिला होता. त्या सूडाचा पुनरुच्चारही खामेनी यांनी आपल्या वादग्रस्त ट्विटमध्ये केला आहे.

“सूड घेतले जाणे अपरिहार्य आहे.’ अशा थेट शब्दात खामेनी यांनी धमकी दिली आहे. ट्रम्प जरी अध्यक्षपदावरून पायउतार झाले असले तरी त्यांच्या कृत्याची शिक्षा त्यांना दिली जाईलच, असा गर्भित इशाराच त्यांनी दिला. ट्रम्प बुधवारी अध्यक्षपदावरून पायउतार झाले आणि थेट फ्लोरिडाला गोल्फ खेळण्यासाठी रवाना झाले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.