ट्विंकल खन्नाने आपली कन्या नितारा हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे आहे. त्यामध्ये तिने निताराला मास्क सुपरहिरो बनवले आहे. करोनाच्या सर्व प्रोटोकॉलचे पालन करण्याचे तिने निताराला शिकवले आहे.
View this post on Instagram
यामध्ये नितारा मास्क घातलेल्या सुपरहिरोच्या गेटअपमध्ये दिसते आहे. घरामध्येच राहावे, यासाठी तिने बाल्कनीलाच आपले जंगल समजले आहे, निताराने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट, डार्क सन ग्लास आणि मास्क घातला आहे. तिच्या या व्हिडिओला खूप लाईक मिळत आहेत.
View this post on Instagram
मुलांनी करोनाचे प्रोटोकॉल स्वतःहून पाळावेत, यासाठी ट्विंकलने केलेली युक्ती अफलातून आले. जर मुलांना अशा युक्तांद्वारे करोनाचे प्रोटोकॉल पाळणे शिकवले, तर ते मुलांच्या अंगवळणी पडतील. याशिवाय लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर न जाण्याची सवयदेखील लागेल असा ट्विंकलचा अंदाज अगदी बरोबर आहे.
अलीकडेच अक्षयकुमारने गौतम गंभीरच्या “एनजीओ’ला करोनाविरोधी उपाययोजनांसाठी एक कोटी रुपयांची देणगी दिली आहे. तर ट्विंकल खन्नाने 100 ऑक्सिजन कॉन्सट्रेटची व्यवस्था केली आहे.