Twinkle Khanna – अभिनेत्री डिंपल कपाडियाची लेक आणि अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना भलेही चित्रपटांपासून दूर असेल पण अभिनेत्री एक लेखक म्हणून आपला ठसा उमटवत आहे. ट्विंकल तिच्या स्पष्टवक्ते शैलीमुळे देखील चर्चेत असते. 1990 आणि 2000 च्या दशकात ट्विंकलच्या अभिनयाला चाहत्यांनी खूप दाद दिली
अलीकडेच ट्विंकल खन्नाने 1999 मध्ये आलेल्या ‘बादशाह’ चित्रपटात शाहरुख खानसोबत काम करण्याबाबत अनेक खुलासे केले होते. ट्विंकल खन्नाने सांगितले की, शाहरुख खानसोबत बादशाह चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिने आउटफिटमध्ये फिट होण्यासाठी स्वतःला उपाशी ठेवले आणि आठवडाभर फक्त हरभरे खाल्ले.
याशिवाय ‘मोहब्बत हो गई’ गाण्याच्या शूटिंगदरम्यान तिच्या पोटात गॅसचा गोळा झाला होता. ट्विंकल खन्नाने कबूल केले की तिला शाहरुख खानने उचलले जाण्याची भीती वाटत होती. या गाण्यात शाहरुख खानने मला उचलून धरले होते आणि मी खूप घाबरले होते.
त्या घटनेची आठवण करून देताना ट्विंकल म्हणाली, ‘मला कोणत्याही चित्रपटात मनीष मल्होत्राचे कपडे घालावे लागले तर याचा अर्थ असा होता की एकतर मी अन्न खाणार नाही किंवा मला पोट आत ढकलावे लागेल. चित्रपटातील एका गाण्यात आठवडाभर मी हरभरा जगले’ अभिनेत्री ट्विंकल खन्नाचे स्टारडम आजही पाहायला मिळते. अक्षय कुमारसोबतच्या लग्नानंतर अभिनेत्रीने चित्रपटांपासून ब्रेक घेतला. तरी ट्विंकल नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.