उत्तरप्रदेशात भीषण अपघात ; २० प्रवाशांचा मृत्यू

कन्नौज – प्रवासी बस आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात २० जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या महिनीनुसार, कन्नौजमधील गुरसहायगंज येथून जयपूरला ही बस जात होती. यातच शुक्रवारी मध्य रात्री उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये हा अपघात झाला.

दरम्यान, ट्रक आणि बसच्या अपघातानांतर बसला आग लागली. आगीची तीव्रता अधिक असल्यानं बसमधील प्रवाशांना बाहेर पडणं कठीण झालं होतं. त्यामुळे अनेक प्रवाशांना बाहेर पडता आलं नाही. यामध्ये २० प्रवाशांचा मृत्यू झाला. तर २१ जण जखमी झाले आहेत.

याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. या भीषण अपघातात अनेक प्रवाशांनी आपले प्राण गमले आहे. मी  मृतांच्या कुटूंबीयांप्रती दुःख व्यक्त करतो तसेच जखमी प्रवाशांनी लवकर बर होण्याची मी प्रार्थना करतो  असं ट्विट करून त्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.