पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने तुकाराम बीज निमित्त देहूगाव व आळंदी येथे जाणाऱ्या भाविकांच्या सोईसाठी उद्या (दि. 9 मार्च) 125 जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. स्वारगेट, मनपा भवन, पुणे स्टेशन येथून देहूगाव येथे जाण्यासाठी बस सोडण्यात येणार आहेत.
संत तुकाराम बीज निमित्त अनेक भाविक संत तुकाराम महाराज यांच्या दर्शनासआठी देहूगाव येथे येतात. त्याबरोबरच अनेकजण देहूगांव येथून आळंदी येथे दर्शनासाठी जातात. त्या दृष्टीकोनातून पीएमपीने जादा बस सोडल्या आहेत.
Weather Update : राज्यातील उकाडा पुन्हा वाढणार; कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा
तसेच, देहूगाव येथील झेंडेमळाजवळील मिलिटरी परिसरात तात्पुरते स्थानक उभारण्यात आले आहे. तर, देहूगाव येथून आळंदीला जाण्यासाठी गाथा मंदिर रस्त्यावरील मोकळ्या जागेतून बस सोडण्यात येणार आहेत.