मुंबई – युथ कॉंग्रेसच्या बैठकीत तुफान राडा झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. मुंबईमध्ये ही बैठक सुरु होती यादरम्यान कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले.कुणाल राऊत यांना बदलण्याच्या मागणीवरून हा राडा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.युथ काँग्रेसमधील दोन गट आपापसात भिडल्याचे यावेळी पाहायला मिळाले.
या बैठकीसाठी भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी.व्ही. श्रीनिवास आणि प्रभारी कृष्णा अल्लावरू हे युवक काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी मुंबईत पोहोचले होते. बैठकीदरम्यान युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्याविरोधात एक गट आक्रमक झाला. यावेळी त्यांच्या कामावर नाराजी व्यक्त करत अनेकांनी त्यांना बदलण्याची मागणी केली. यानंतर राऊत यांचे समर्थक आक्रमक झाले आणि त्यांनी जोरदार राडा सुरु केला.
यावेळी राऊत यांचे समर्थक चांगलेच संतप्त झाले होते. यामुळे दोन गटात तुफान राडा झाला. या राड्यात दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांवर खुर्च्या देखील भिरकावल्या..शिवराज मोरे आणि अनिकेत म्हात्रे या गटाने कुणाल राऊत यांना विरोध केला होता. या विरोधानंतर हा मोठा राडा झाला होता.याचे काही व्हिडीओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.