मुंबई – ओम राऊत निर्देशित “आदिपुरुष’ चित्रपट रिलीज होताच युजर्सकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या लूक्सला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला यानंतर आता या चित्रपटातील डायलॉग टपोरी असल्याची टीका युजर्स कडून करण्यात येत आहे.
चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली जात आहे. ‘रामायण’ या महाकाव्यातील पात्रे आणि घटना चुकीच्या पद्धतीने मांडल्याबद्दल प्रेक्षक या चित्रपटाविरोधात नाराजी व्यक्त करत आहेत. भगवान श्रीराम यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारत आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन माता सीतेची भूमिका साकारत आहे
दरम्यान, अश्यातच रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेतील अभिनेते ‘अरुण गोविल’ यांनी देखील आदिपुरुष चित्रपटताबद्दल आपली भावना व्यक्त केली आहे. अभिनेते ‘अरुण गोविल’ यांनी ‘रामायण’ मालिकेतील प्रभू श्री रामाची भूमिका साकारली होती.
नुकतंच एका मुलाखतीदरम्यान अरुण गोविल यांना ‘आदिपुरुष’बद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्यांच्या बोलण्यातून असं दिसून येत होत की, ते देखील चित्रपटाबाबत नाराज आहेत.
अरुण गोविल यांच्या मते हा श्रद्धेचा मुद्दा आहे. रामायण ही सर्वांची श्रद्धा आहे. त्यात छेडछाड करू नये. आधुनिकतेची आणि पौराणिक कथांची चर्चा रामायणावर करू नये. व्हीएफएक्स आणि इफेक्ट या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पण पात्रे अचूकपणे मांडणे आवश्यक आहे.
रामायणातील राम यांच्या मते, जर हा चित्रपट मुलांसाठी बनवला गेला असेल तर त्यांना तो आवडला का ते विचारा. दुसरीकडे भाषेबाबत त्यांनी सांगितले की, मला हा प्रकार आवडत नाही. अरुण गोविल यांना आदिपुरुष मध्ये वापरलेली भाषा अजिबात आवडली नाही. असं देखील ते यावेळी म्हणाले आहेत.