Vicky Kaushal and Trupti Dimri| ‘ॲनिमल’ चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली तृप्तीच्या हाती नवा चित्रपट लागला आहे. बॉलीवूड अभिनेता विकी कौशल आणि तृप्ती डिमरी लवकरच एका नव्या चित्रपटात एकत्र काम करताना पाहायला मिळणार आहे. विकी कौशल आणि तृप्ती डिमरी ‘बॅड न्यूज’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. विकीने सोशल मीडियावर याबाबत घोषणा केली आहे.
विकी कौशल पोस्ट
विकी कौशलने सोमवारी सोशल मीडिया अकाऊंटवरून ‘बॅड न्यूज’ या नव्या चित्रपटाची घोषणा केली. यासोबतच चित्रपटाच्या रिलीज होण्याची तारीख देखील जाहिर करण्यात आली आहे. विकीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये विकी कौशल, तृप्ती डिमरी आणि एमी विर्क वेगवेगळ्या स्टाईलमध्ये एकत्र दिसत आहेत. विकी कौशलने या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ब्रेकिंग न्यूज: ही वाईट बातमी आहे! तुम्ही यासाठी तयार नाही कारण आम्हीही तयार नव्हतो!’ Vicky Kaushal and Trupti Dimri|
View this post on Instagram
विकी कौशल, तृप्ती डिमरी आणि एमी विर्क यांचा चित्रपट ‘बॅड न्यूज’ 19 जुलै 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘बॅड न्यूज’ या चित्रपटाच्या घोषणेनंतर विकी कौशल आणि तृप्ती डिमरीचे चाहते खूपच उत्सुक दिसत आहेत. विकीच्या पोस्टनंतर अनेकांनी त्यांना या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. Vicky Kaushal and Trupti Dimri|
दरम्यान, विकी कौशल, या चित्रपटाशिवाय ‘लव्ह अँड वॉर’, ‘छावा’ आणि ‘मेरे मेहबूब मेरे सनम’ या चित्रपटात देखील पाहायला मिळणार आहे. तर तृप्ती ‘बॅड न्यूज’सह ‘भूल भुलैया 3’ चित्रपटाद्वारे देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
हेही वाचा: