जालना – राज्यात अपघाताच्या मालिकांना ब्रेक लागल्याचे दिसून येत नाही आहे. वेगवेगळ्या भागातून दररोज अपघाताच्या बातम्या बघायला मिळत आहे. असाच एक भीषण अपघात आज जालना-जळगाव महामार्गावर घडला आहे. ट्रक-रिक्षाची समोरासमोर धडक झाल्यामुळे 2 जण जागीच ठार झाले आहेत तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे.
जालना- जळगाव महामार्गाअसलेल्या बानेगाव फाट्याजवळ एक मालवाहू ट्रक भरधाव वेगात येत होता तर विरुद्ध दिशेने त्याच वेगात एक रिक्षा येत होता. दरम्यान यांच्यात जोरदार समोरासमोर टक्कर झाली ही टक्कर इतकी भीषण होती की रिक्षाच्या समोरच्या भागाचा चुराडा झाला होता. या अपघात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच भोकरदन पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी जखमींना तात्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. पोलीसांना मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.